BIG BOSS 20: 'बिग बॉस'चा २० वा सीजन ६ सप्टेंबरपासून होणार सुरू; सलमान खान पुन्हा होस्टिंगच्या भूमिकेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 h ago
सलमान खान घेऊन येतोय 'बिग बॉस'चा बहुप्रतिक्षित २० वा सीजन; टीझर रिलीज
सलमान खान घेऊन येतोय 'बिग बॉस'चा बहुप्रतिक्षित २० वा सीजन; टीझर रिलीज

 

मुंबई 

जिओहॉटस्टार (JioHotstar) आणि कलर्स वाहिनीने मंगळवारी लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस'च्या आगामी सीजनचा पहिला टीझर रिलीज केला आहे. विशेष म्हणजे, या शोच्या ऐतिहासिक २० व्या सीजनचे होस्टिंग करण्यासाठी अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा सज्ज झाला असून हा शो आगामी ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणाऱ्या फ्रँचायझींपैकी एक असलेल्या या शोच्या नवीन सीजनबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये सलमान खान घोड्यावर स्वार होऊन एका ग्रँड अंदाजात एन्ट्री करताना दिसत आहे. "जो करण अर्जुन मध्ये झाला होता, तो होगा अब बिग बॉस मध्ये... तथास्तु!", असे गूढ विधान करत त्याने या सीजनच्या रहस्यावर प्रकाश टाकला आहे.

नवीन गेम आणि अनपेक्षित ट्विस्ट

या नवीन सीजनबाबत बोलताना सलमान खानने स्पष्ट केले की, 'बिग बॉस'चा प्रत्येक सीजन नवीन डायनॅमिक्स आणि अनपेक्षित ट्विस्ट घेऊन येतो, मात्र या वेळचा सीजन पूर्णपणे वेगळा असणार आहे. यातील मुख्य रहस्य शोधण्यासाठी प्रेक्षकांना मिळालेल्या क्लूसवर लक्ष ठेवावे लागेल, असे सांगत त्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. टीझर ही केवळ सुरुवात असून प्रेक्षकांना आगामी काळात मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.