National Film Awards 2026: अनन्त नाग यांना फाळके पुरस्कार, कार्तिक आर्यन व ममुटी सर्वोत्कृष्ट अभिनेता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 m ago
राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेते मामुटी
राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेते मामुटी

 

एकता नगर 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी गुजरातच्या एकता नगर येथे ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ कन्नड अभिनेते अनन्त नाग यांना प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. तसेच यामी गौतम, ममुटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'अनुच्छेद ३७०' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला. आदित्य जांभळे दिग्दर्शित 'अनुच्छेद ३७०' (Article 370) या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर 'ब्रह्मयुगम्'साठी ममुटी आणि 'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यन यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इतर प्रमुख पुरस्कारांची घोषणा

रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, तर राजकुमार पेरियासामी यांना तमिळ चित्रपट 'अमरन'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे गौरवण्यात आले. संजय मिश्रा यांना 'भक्षक' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. तसेच अभय जोधपुरकर आणि वैकोम विजयालक्ष्मी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.