गुजरातच्या भावनगरमध्ये विषारी मद्यामुळे खळबळ; मृतांचा आकडा ७ वर पोहोचला, ३० जण रुग्णालयात दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 9 h ago
गुजरातमध्ये दारूबंदी असूनही विषारी मद्याचा कहर; ७ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर
गुजरातमध्ये दारूबंदी असूनही विषारी मद्याचा कहर; ७ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

 

भावनगर 

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट आणि विषारी मद्य (Spurious Liquor) प्राशन केल्यामुळे मृतांचा आकडा वाढून सातवर पोहोचला आहे, तर ३० जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मद्यपान बंदी असलेल्या गुजरात राज्यात खळबळ उडाली आहे. भावनगर श्रेणीचे पोलीस महानिरीक्षक (IGP) आर. व्ही. असारी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ बुलेटर्गर्सना (Bootleggers) ताब्यात घेतले असून, एकूण २१ जणांवविरोधात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्तेज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकडी गावात एका पार्टीदरम्यान विषारी मद्य प्यायल्यानंतर काही मित्रांची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर इतर गावांमधील नागरिकही प्रभावित झाल्याचे समोर आले.

मध्य प्रदेशमधून मद्य पुरवठा झाल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडितांनी एका लोकप्रिय भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) दुय्यम आणि नक्कल केलेल्या (duplicate) बाटल्यांमधून दारू प्राशन केली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य मॉनिटरींग सेलचे पथक नेमण्यात आले आहे. प्राथमिक तपासात या बाटल्या मध्य प्रदेशमधून पुरवल्या गेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्या नेमक्या कुठून आणल्या गेल्या आणि कोणी पाठवल्या, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सर टी हॉस्पिटल आणि अहमदाबादच्या रुग्णालयातील डॉक्टरांची पथके रुग्णांच्या उपचारासाठी तैनात करण्यात आली आहेत.



Latest News