निवडणूक आयोगाच्या विरोधात CJP आक्रमक, मुंबईतील शिवाजी पार्कवर हजारोंच्या उपस्थितीत आंदोलन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन

 

मुंबई :

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरेज जनता पार्टी'तर्फे (CJP) शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी निवडणूक आयोग आणि सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत, मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी 'जंतरमंतर २.०' तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दिग्गजांची उपस्थिती आणि नेत्यांचे आरोप

मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, तरीही मोठ्या संख्येने तरुण आणि कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमा झाले. या आंदोलनात ज्येष्ठ अभिनेते नसीरद्दीन शाह, शबाना आग्मी, चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज, हंसल मेहता, संगीतकार विशाल दादलानी आणि महात्मा गांधींचे प्रपौत्र तुषार गांधी उपस्थित होते. मतदारयाद्यांमधील कथित फेरफार आणि त्रुटींवर बोट ठेवून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

देशव्यापी आंदोलनाचा इशारा

CJP नेते अभिजित दिपके यांनी आरोप केला की, गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन फौजदारी चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी त्यांनी केली. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण देशातील तरुण दिल्लीत एकत्र जमतील आणि 'जंतरमंतर २.०' सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.