COMMONWEALTH GAMES 2026: नीरज चोप्राचे भालाफेकमध्ये शानदार रौप्य पदक, पदार्पणवीर यशवीर सिंगने पटकावले कांस्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
ग्लासगो: राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक, तर यशवीर सिंगने जिंकले कांस्य पदक.
ग्लासगो: राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक, तर यशवीर सिंगने जिंकले कांस्य पदक.

 

ग्लासगो

राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिकूल हवामानावर मात करत दमदार पुनरागमन केले आणि भारतासाठी रौप्य पदक जिंकले. त्याच्यासोबतच युवा भालाफेकपटू यशवीर सिंगने आपल्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत आश्चर्यकारकरित्या कांस्य पदक पटकावले. या विजयासह भारताच्या दोन खेळाडूंनी पोडियमवर स्थान मिळवले.

टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता २८ वर्षीय नीरज चोप्राने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८५.८३ मीटरचा सीझन-बेस्ट थ्रो करत दुसरे स्थान निश्चित केले. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या नीरजचे हे या हंगामातील केवळ दुसरे स्पर्धात्मक पुनरागमन होते. यापूर्वी त्याने दोहा डायमंड लीगमध्ये ८५.६९ मीटर थ्रोसह चौथे स्थान मिळवले होते. दरम्यान, पदार्पण करणारा २४ वर्षीय यशवीर सिंग सुरुवातीला पिछाडीवर होता, मात्र त्याने शेवटच्या प्रयत्नात ८५.४१ मीटर भालाफेक करत ऐतिहासिक कांस्य पदकाला गवसणी घातली. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिराजने ८९.७५ मीटर थ्रो करत सुवर्णपदक पटकावले.



Latest News