पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.यावर भारताने पाकिस्तानाला चोख उत्तर दिले आहे.
भारतातर्फे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय भूभाग पाकिस्तानने रिकामा करावा. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवला पाहिजे.याचबरोबर पाकिस्तानमध्ये होत असलेले अल्पसंख्यांकांवरील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवावे असे प्रतिउत्तर भारताने दिले आहे.
भारताच्या वतीने बोलतांना पेटल गेहलोत म्हणाल्या कि, "पाकिस्तानने दक्षिण आशियातील शांततेसाठी तीन पावले उचलावीत. ती म्हणजे, दहशतवाद थांबवावा व त्यांच्या पायाभूत सुविधा लगेचच उद्ध्वस्त कराव्यात.याचबरोबर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांविरुद्ध मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन होत आहे ते बंद करावे.
पाकिस्तान हे जगातील आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातलेल्या दहशतवादी संस्थांचे आणि दहशतवाद्यांचे सर्वात मोठे घर बनले आहे. असेही गेहेलोत म्हणाल्या.