Ranchi Student Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मंदिर, मशीद आणि गुरुद्वारामधून अन्न व मदतीचा आधार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मंदिर, मशीद आणि गुरुद्वारामधून अन्न व मदतीचा आधारK
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मंदिर, मशीद आणि गुरुद्वारामधून अन्न व मदतीचा आधारK

 

रांची

झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपर लीकविरोधात रांची येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता सर्वधर्मीय घटकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. राजधानीच्या मध्यभागी गेल्या १३ दिवसांपासून आंदोलनासाठी कॅम्प करून बसलेल्या विद्यार्थ्यांना मंदिरे, मशिदी, गुरुद्वारे आणि नागरिक अन्न व मदतीचा पुरवठा करत आहेत. मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांचा जोश कमी झालेला नाही.

जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर ताडपत्रीच्या शेडखाली बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध समुदाय आणि व्यक्तींकडून जात-धर्म न पाहाता गरम जेवण पुरवले जात आहे. शनी मंदिर, पहाडी मंदिर, परिसरातील मशिदी आणि गुरुद्वारकडून मोठ्या प्रमाणावर अन्नपुरवठा होत आहे. तसेच विविध जिल्ह्यांतील कुटुंबे घरचा डबा आणि पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. स्वयंसेवकांनी सांगितले की, हे अन्न कोणतीही धार्मिक किंवा जातभेद न पाहाता सर्व विद्यार्थ्यांसाठी समप्रमाणात वाटले जात आहे.

विद्यार्थ्यांचा स्पष्ट संदेश — जात-धर्म नाही, आमची एकच ओळख

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म्स मंचाने आंदोलनात कोणतीही जातीवादी किंवा राजकीय विधाने टाळण्यासाठी आचारसंहिता (Code of Conduct) लागू केली आहे. आंदोलक विद्यार्थी संजित कुमार यांनी स्पष्ट केले की, "आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन नसून न्याय मागणारे विद्यार्थी आहोत." आमची लढाई प्रणालीतील सुधारणांसाठी आहे, असे अन्य आंदोलक एमडी करीम यांनी सांगितले. दरम्यान, १४ वी जेपीएससी आणि इतर परीक्षा रद्द करण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी करत ६ विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.