मालेगावातील मुस्लीम बांधवांनी घेतला कौतुकास्पद निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
गणपती मिरवणूक
गणपती मिरवणूक

 

मालेगाव (जि. नाशिक) : यावर्षी गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीची तारीख एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा, तसेच शांतता-सुव्यवस्थेला हातभार लागावा यासाठी ईद -ए- मिलादची मिरवणूक गणपती विर्सजनच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. २९) काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सुन्नी जमेतुल उलेमा व मुंबई येथील रझा ॲकडमीतर्फे हा निर्णय घेण्यात आला. त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

हिंदू व मुस्लिम बांधवाचे सण गेल्या वर्षभरात बहुसंख्यवेळी एकत्रितच आले. बकरी ईद व आषाढी एकादशी २८ जुनला एकत्र आल्याने राज्यातील मुस्लिम बांधवांनी एक दिवसानंतर कुर्बानी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे त्यावेळी सर्वत्र स्वागत करण्यात आले होते. राज्यात गणपती विसर्जन मिरवणूक गुरूवारी (ता. २८) होणार असल्याने मुस्लीम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक शुक्रवारी (ता. २९) काढण्याचा निर्णय घेतला. शहरात यावर्षी ईद-ए-मिलादुन्नबीची १०४ वी मिरवणूक काढली जाणार आहे. 

मिरवणुकीला अकोला येथील मौलाना सय्यद जकी मिया नक्कशबंदी हे प्रमुख असणार आहेत. यासंदर्भात येथील मशिदीतून माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी आठला येथील इस्लामपुरा भागातील हनफिया सुन्नीया मदरसा येथून मिरवणूक काढली जाईल. येथे १०४ वर्षात प्रथमच यंदा मिरवणुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शांतता नांदावी, हिंदू-मुस्लीम समाजात भाईचारा राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात शुक्रवारीच ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक होईल. या संदर्भात चंद्रदर्शन झाल्याच्या दोन दिवसानंतर हा निर्णय घेतला असल्याचे रझा ॲकडमीचे मुंबई येथील सदस्य सईद नुरी यांनी सांगितले.

मिरवणुकीच्या बंदोबस्ताबाबत बोलताना मालेगावचे अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती म्हणाले, “प्रशासनाने या संदर्भात मुस्लीम बांधवांना विनंती केली होती. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये हा हेतू होता. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सोशल मिडीयावर पोलिस लक्ष ठेवून आहेत.” तर, निर्णयाबाबत ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूकीचे संयोजक युसूफ इलियास म्हणाले, “राज्यासह शहरात शांतता नांदावी यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठांनी हा निर्णय घेतला असून या निर्णयाचे आम्ही सगळेजण स्वागत करतो. हा निर्णय समाजहितासाठी आहे. राज्यात शुक्रवारी मिरवणूक काढण्यात येईल.”  

-जलील शेख, मालेगाव (जि. नाशिक) 

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻 


‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय


हिंदू मुस्लीम धार्मिक सलोखा जपणारे भद्रकाली तलावडी मित्र मंडळ


मुस्लिम कारागिर साकारत आहेत नगरमधील श्री विशाल गणेश मंदिर


गणरायाच्या पूजेसाठी मुस्लीम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू


गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लीम

 

धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

 

श्रीगणेशाला अभिवादन करणारे उर्दू साहित्य

 

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम


लातूरच्या मुस्लिम बांधवांनी घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय


गणेशोत्सवादरम्यान साताऱ्यातील मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय


विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लीम सहकाऱ्यांना पूजेचा मान


नाशिक येथे पार पडली हिंदू-मुस्लिम समुदायाची अमन परिषद

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube