जीवनात गुरुचे सामर्थ्य सर्वश्रेष्ठ : प्रा. डॉ. नसीमा पठाण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सोलापूर : रामलिंगेश्वर प्रशालेत गणेशोत्सव व्याख्यानमालेत गणेश पूजन प्रसंगी डॉ. नसीमा पठाण, डॉ. भीमाशंकर बिराजदार, कलप्पा म्हेत्रे आदी.
सोलापूर : रामलिंगेश्वर प्रशालेत गणेशोत्सव व्याख्यानमालेत गणेश पूजन प्रसंगी डॉ. नसीमा पठाण, डॉ. भीमाशंकर बिराजदार, कलप्पा म्हेत्रे आदी.

 

मानवी जीवनात जन्मदात्यांप्रमाणे व्यक्तीच्या विकासात गुरुचे सामर्थ्य श्रेष्ठ असल्याचे मत प्रा. डॉ. नसीमा पठाण यांनी व्यक्त केले. तीर्थ (ता. सोलापूर) येथील श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्रीक्षेत्र तीर्थ येथे श्री गणेश उत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्यात्या प्रा. डॉ. पठाण बोलत होत्या. 

त्या पुढे म्हणाल्या, “केवळ एका दिव्याने खोलीतील संपूर्ण अंधार संपतो. त्याप्रमाणे गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात. त्यामुळे आपल्या जीवनातील अज्ञान रुपी अंधार संपतो. व्यक्तीची ओळख त्याला मिळालेल्या शिक्षकांनी केलेल्या संस्कारातून होत असते. कोणत्याही व्यक्तीला सुसंस्कारीत व्यक्ती घडवण्याचे कार्य शिक्षकच करत असतात.
 
विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण ओळखून त्याला विकसित करण्याचे कामही शिक्षक करतात. म्हणूनच विद्यार्थी हे शिक्षकांमध्ये स्वतःच्या आईवडिलांना पाहतात, ते योग्यच मानले पाहिजे. कारण त्यांच्या विकासाचे कार्य शिक्षकांकडून होते. हेच विद्यार्थी पुढे जाऊन स्वतःच्या कार्यातून वेगळी ओळख समाजात तयार करतात.” 

अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी शिक्षकाप्रमाणे फळाची अपेक्षा न धरता नि:स्वार्थ कर्म करीत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कलप्पा म्हेत्रे उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश पट्टणशेट्टी यांनी केले. तर, आभार प्रा. सुधीर सोनकवडे यांनी मानले.  

- प्रकाश सनपूरकर, सोलापूर
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻 

 

‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय


हिंदू मुस्लीम धार्मिक सलोखा जपणारे भद्रकाली तलावडी मित्र मंडळ


मुस्लिम कारागिर साकारत आहेत नगरमधील श्री विशाल गणेश मंदिर


गणरायाच्या पूजेसाठी मुस्लीम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू


गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लीम

 

धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

 

श्रीगणेशाला अभिवादन करणारे उर्दू साहित्य

 

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम


लातूरच्या मुस्लिम बांधवांनी घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय


गणेशोत्सवादरम्यान साताऱ्यातील मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय


विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लीम सहकाऱ्यांना पूजेचा मान

 

नाशिक येथे पार पडली हिंदू-मुस्लिम समुदायाची अमन परिषद

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube