खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. यापार्श्वभूमीवर कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी तिथल्या भारतीयांना देश सोडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारनं कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
सावधगिरी बाळगावी
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक अॅडव्हाझरी जाहीर केली असून यामध्ये कॅनडातील भारतीय नागरिकांनी काय करावं याचे निर्देश दिले आहेत. या अॅडव्हायझरीत म्हटलं, "कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रवास टाळावा
अलीकडेच, भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणारा समुदायाकडून विशेषतः भारतीय उच्चाधिकारी आणि भारतीय विभागांना लक्ष्य केलं गेलं आहे. त्यामुळं भारतीय नागरिकांना कॅनडातील अशा घटना जिथे घडल्या आहेत त्या प्रदेशात आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे "
भारत - कॅनडा तणावाबद्दलच्या ह्याही बातम्या वाचा